नरेंद्र मोदी जी तुम्हाला सीमेवर जवानांचे सांडलेले रक्त कसे आठवले नाही’? – महेबूब शेख

0

शेतमालाचे भाव सातत्याने कोसळत असतात. शेतकऱ्यांना पिकाच्या मध्ये कधीतरी लॉटरी लागते. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत सातत्याने उदासीन असल्याचे दिसून येते. दिल्ली मधील शेतकरी आंदोलन असेल किंवा शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव देणे असेल याबाबतीत सातत्याने दुजाभाव केला जातो.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी नरेंद्र मोदी यांना जाब विचारला आहे. भारतातील कांदा बाजारामध्ये येत असतानाच पाकिस्तान मधील कांदा सुद्धा मार्केटमध्ये आला आहे एकीकडे वारंवार सीमेवरती पाकिस्तानची होणारे हल्ले आणि दुसरीकडे व्यापाराच्या बाबतीत केंद्र सरकारचे असणारे पाकिस्तान वरील हे विशेष प्रेम.

महबूब शेख ट्विट करत म्हणतात की “भारत-पाक सीमेवरती आपल्या देशाच्या जवानांना देशाचे रक्षण करण्यासाठी रक्ताची होळी खेळावी लागत आहे. आपल्या देशातील बाजारात पाकिस्तानचा ‘लाल’ कांदा येत असताना ‘नरेंद्र मोदी जी तुम्हाला सीमेवर जवानांचे सांडलेले रक्त कसे आठवले नाही’? ” अशा आशयाचे त्यांनी ट्विट केले आहे. याच बरोबर नरेंद्र मोदी यांना देशाच्या सैनिकांनी दिलेल्या कुर्बाणीची आठवण करून दिली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.