साधी राहणी उच्च विचारसरणी नाना पाटेकर

0

नाना पाटेकर उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. नाना पाटेकर यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत अनेक उत्तमोउत्तम भूमिका केलेल्या आहेत. विशेषकरून अंकुश या चित्रपटातील त्यांची भूमिका अत्यंत गाजली. हिरोपासून खलनायकापर्यंत भूमिका निभावणारा नाना पाटेकर दिग्ददर्शक म्हणूनही चांगली भूमिका वठवत होता. नाम फौंडशेनच्या निमित्ताने नाना पाटेकरने अनेक शेतकर्यांची व्यथा मांडलेली आहे. महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील मुरूड जंजिरा येथे जन्मलेल्या नाना पाटेकरने १९७८ च्या गमन याचित्रपटाद्वारे बाॅलीवूडमध्ये पदार्पण केले. नाना पाटेकर इतकी वर्षे काम करून १० दशलक्ष डाॅलर्स सुमारे ७३ कोटी च्या मालमत्तेचा मालक आहे. या मालमत्तेत फार्म हाऊस कार आणि इतर मालमत्तांचादेखील समावेश आहे. एवढे करूनही नाना खूप साधे आयुष्य जगणे पसंत करतो. नाना आपले साधे जीवन जगण्यासाठीदेखील ओळखला जातो पण तुम्हाला माहिती आहे नाना पाटेकर स्वताहून आभिनेता बनण्यासाठी आला नव्हता.

नाना पाटेकर अप्लाईड आर्टमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहे. पुण्याजवळ खडकवा ला येथे अभिनेत्याचे २५ एकरांमध्ये फार्महाऊस आहे. जेव्हा जेव्हा नानाला एकांत होण्याची इच्छा होते तेव्हा तो त्याच्या फार्महाऊसवर जातो. तुम्हाला आठवत असेल तर दिग्दर्शक संगीत शिवानचा द पाॅवर आॅफ वन या चित्रपटाचे चित्रिकरणही याच फार्महाऊसमध्ये झाले होते.

नाना केवळ बाहेरूनच मूळ रहिवासी नसून आपल्या फार्महाऊसमध्ये तो धान, गहू हरभरा स्वतासाठी धान्य पेरतो. नाना पाटेकरांच्या या फार्महाऊसमध्ये ७ खोल्यांशिवाय एक मोठा हॉलदेखील आहे. नानाने ते सुंदर बनविण्यासाठी सिंपल वूडन फर्निचर आणि टेराकोटा फ्लोर बसविला आहे. या भव्य फार्महाऊसची किमंत सुमारे १२ कोटी असल्याचे म्हटले जाते. नाना पाटेकर इतक्या संपत्तीचे धनी असतानादेखील त्यांची विचारसरणी उच्च असून राहणी अत्यंत साधी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.