पंतप्रधानांनी ‘मनकी बात’ मधुन गौरविलेले अकोल्याचे मुरलीधर राऊत काँग्रेसमध्ये. नाना पटोलेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश!

0

नोट बंदीच्या कालावधीमध्ये महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पैशांची काळजी न करता मोफत जेवण देणारे अकोल्याचे मुरलीधर राऊत यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. नोटबंदी झाल्यामुळे प्रवास करत असताना लोकांच्या कडे पैसे नव्हते. आर्थिक टंचाईला प्रवास करत असताना नागरिकांना सामोरे जावे लागले. अशा काळामध्ये जेवण देण्याचे कार्य त्यांनी पार पाडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 16 नोव्हेंबर 2016 मध्ये आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून मुरलीधर राऊत यांच्या कार्याचा मोठा गौरव केला होता.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अकोला दौऱ्यात बाळापूर तालूक्यातील पारस फाटा येथील ‘हॉटेल मराठा’चे संचालक आणि सुप्रसिद्ध शेतकरी मुरलीधर राऊत यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. गुरूवारी रात्री ‘हॉटेल मराठा’ येथे हा कार्यक्रम पार पडला आहे.

त्यांनी कोरोना काळातही राऊत यांनी प्रवास करत असताना रस्त्यावर अडकलेल्या प्रवासी वाहक ड्रायव्हर अशा कित्येक लोकांना जेवण देण्याचा उपक्रम त्यांनी राबविले. सोबतच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे मोफत लग्न लावून देण्याचा उपक्रम त्यांनी सुरु केला. या उपक्रमांतर्गत त्यांनी 30 पेक्षा अधिक मुलींचे लग्न लावून दिले. ज्यांचे सामाजिक काम फार मोठी आहे त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आपल्या कामास सुरुवात केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.