मुंडेंचा सेवाधर्म: विवाहाला मदत स्वीकारताना कुटुंबीयांचे डोळे पाणावले

0

कोरोना झालेल्या रुग्णांच्या बाबतीत आजही लोक सामाजिक अंतर ठेवून राहतात ही बाब अत्यंत चांगली आहे. मात्र बरे झाल्यानंतर सुद्धा लोक त्यांच्याशी संवाद साधत नाहीत. अशाच रुग्णांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सेवा धर्म या संकल्पनेतून विविध ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून लसीकरणासाठी मोफत वाहनसेवा, कोविड केअर सेंटरची उभारणी, कोरोनाबाधीत कुटूंबातील लग्नासाठी मदत असे विविध उपक्रम राबविले जात आहेत.

परळी येथील रमेश लोखंडे व प्रकाश वाव्हळे या दोन कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत धनंजय मुंडेंच्या आई रुक्मीणबाई मुंडे यांच्या हस्ते सेवा धर्म उपक्रमाच्या माध्यमातून मदत देण्यात आली आहे. या वेळी ‘आम्ही कोरोनाग्रस्त होतो तेव्हा आमचे काय होईल, आमच्या मुलीचं काय होईल, ही चिंता मनात घर करत होती, पण बरे होऊन आल्यावर लेकीच्या लग्नासाठी धनंजय मुंडेंनी दिलेली मदत दिली, आम्ही विसरणार नाही, असे सांगताना लोखंडे दाम्पत्यांचे डोळे पाणावले.

Leave A Reply

Your email address will not be published.