खासदार अमोल कोल्हे यांची ती शपथ खरी झाली आणि मगच त्यांनी फेटा बांधला!

0

खासदार अमोल कोल्हे आणि मंत्री धनंजय मुंडे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. निवडणुकीचे पडघम वाजायला लागले होते. निवडणुकीचे चांगलेच वातावरण निर्माण झालेलं. अशाच प्रसंगात खा. अमोल कोल्हे यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात शिवस्वराज्य यात्रेत शपथ घेतली की धनंजय मुंडे आमदार झाल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही. या बद्दल धनंजय मुंडे म्हणतात की “विधासभेच्या वेळी डॉ. अमोल कोल्हे हे परळी येथे माझ्या प्रचारसभेसाठी आले होते. तेव्हा, त्यांनी प्रण केला होता की, धनंजय मुंडे निवडून आले तरच आयुष्यात फेटा घालेन, अन्यथा फेटा बांधणार नाही”.

धनंजय मुंडे यांच्या संघर्षाचे चीज झालं. त्यांना जनतेने मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. त्याच्या नंतर तब्बल चार महिन्यांनी अमोल कोल्हे यांनी फेटा बांधला.शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या निमित्ताने हा प्रण पूर्ण झाल्याचं सांगताना धनजंय मुंडे यांनी अभिमान व्यक्त केला. मी, निवडून आलो. माझं भाग्य बघा, कोल्हे साहेबांचा छत्रपती शंभूराजे हा कार्यक्रम सुरू होता आणि मला फेटा बांधायची वेळ आली. डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती शंभूराजे यांच्या वेशभूषेत होते,” असं त्यांनी सांगितलं.

त्यावेळी धनंजय मुंडे म्हणाले होते. एखाद्या मावळ्याला छत्रपती संभाजीराजे यांचा सत्कार करण्याची संधी मिळाल्यानंतर जो आनंद होत असेल तोच आनंद आज २१ व्या शतकात छत्रपतींच्या वेशभूषेत असलेल्या माझ्या जिवलग मित्राचा सत्कार करताना मावळा म्हणून मला झाला,”! असे गौवपूर्ण उद्गार धनंजय मुंडे यांनी काढले होते. अमोल कोल्हे आणि धनंजय मुंडे यांच्या मैत्रीचे किस्से लोकांत कायम चर्चिले जातात!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.