मोदीजी कधीतरी जनसामान्यांची सुद्धा हेरगिरी कराच – भाई जगताप

0

भारत भारतातील फोन टॅपिंग चे प्रकरण सध्या जगभरामध्ये चर्चेत आहे. देशातील महत्त्वपूर्ण व्यक्तींचा फोन हॅक करत त्यामध्ये खाजगी व महत्त्वपूर्ण असणारी माहिती वापरण्यात आली असल्याने चांगलाच देशभरामध्ये गोंधळ उडाला आहे. यामध्ये देशाच्या राजकारणातील महत्त्वाची नेते न्यायाधीश व्यवसायिक राजकीय रणनितीकार तसेच माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आहे.

ही माहिती परदेशातील तंत्रज्ञानाचा वापर करत मिळवण्यात आली आहे. यावरून भारतीय जनता पक्षावर टीका करण्यात येत आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे. यावर टीका करत काँग्रेस पक्षाचे नेते भाई जगताप म्हणाले आहेत की “शेटजी कधीतरी जनसामान्यांची सुद्धा हेरगिरी कराच…महागाई, बेरोजगारी, पेट्रोल भाववाढ, जीडीपी, डबघाईला गेलेली अर्थव्यवस्था याबाबत लोक काय बोलत आहेत ते ऐकाच” अशा आशयाचे ट्विट करत चांगलेच भारतीय जनता पक्षाचे वाभाडे काढले आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.