हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत आहे; कोकण दौऱ्यात उध्दव ठाकरेंचा मोदींवर निशाणा!

0

तौते चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळाच्या मुळे झालेल्या परिस्थितीची पाहणी करायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीला गेले आहेत.

त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या सोबत आढावा बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो असलेचे सांगितले. तसेच पंचनामे झाल्याच्या बरोबर मदत जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.

यावेळी बोलत असताना त्यांनी सांगितले की यावेळी त्यांनी कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल असं स्पष्ट केलं. दरम्यान त्यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हणाले की यावेळी त्यांनी आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही. हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचं सांगत मोदींवर निशाणा साधला.

“मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. “पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार,” असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.