
मोदींनी राजीनामा द्यावा. ट्विटरवर #resignmodi ट्रेंडिंग
नवी दिल्ली : देशभरात रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स अपुरे पडत असताना करोना लसींचा देखील तुडवडा जाणवत आहे. देशातील अनेक भागांत कडक लॉकडाऊन पुन्हा लावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी समाज माध्यमांवर आता जोर धरू लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा करोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे २,५९,१७० नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर १,७६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १,५३,२१,०८९ पोहोचली. करोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा १,८०,५३० वर पोहोचला आहे.
या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर २ लाख युझर्सनी #ResignModi या हॅशटॅगचा वापर करत पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली. तर, काही युझर्सनी पंतप्रधान मोदींची तुलना ‘निरो’शी केली. दरम्यान, यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके आणि डाव्या पक्षांच्या अधिकृत ट्विटर हँडलचाही समावेश असल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, महाराष्ट्रात देखील परिस्थिती बिकट असून, उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यात १५ दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता असल्याचे संकेत आवाज पार पडलेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना अनेक मंत्र्यांनी दिले आहेत.