देशाची माफी मागायला सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहू्र्त मिळणार नाही’ – नितीन राऊत

0

आज वि.दा. सावरकर यांची १३८ वी जयंती देशभरात साजरी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत बहुतांश नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी मराठी मध्ये साहित्य निर्मिती केली होती. तसेच त्यांना स्वतंत्र संग्रामातील सहभागामुळे इंग्रजांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यांना अंदमान येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. कैदेत असताना सावरकर यांनी इंग्रजांना माफीचं पत्र लिहिलं होतं. असे सांगितले जाते. यापूर्वी राहुल गांधींनी जाहीर सभेत या माफीचा उल्लेख सुध्दा केला होता.

आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितीन राऊत यांनी ट्विट करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ते म्हणाले की “कोविडची साथ हाताळता आली नाही याबद्दल मा. पंतप्रधानांनी देशाची माफी मागायला आजचा सावरकर जयंतीसारखा उत्तम मुहूर्त मिळणार नाही”. अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे; सोबतच नरेंद्र मोदींच्या अपयशाच्या बद्दलची जाणीव पण लोकांनां करून दिली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.