कोरोना काळात मोदींनी केलेल्या कामाची माहिती देणारं ५६ कोऱ्या पानांचं पुस्तक प्रकाशित!

0

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वरती एक पुस्तक लिहिण्यात आले आहे. या पुस्तकाचा लेखक अजून समजलेला नाही मात्र पुस्तकावरती लेखकाचे नाव म्हणून बेरोजगार भक्त असे लिहिण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या कामकाजा वरून जगभरातून टीका केली जात आहे. ज्या प्रकारे लोकांना सहाय्य करायला पाहिजे ज्याप्रकारे आरोग्यव्यवस्था उभा करायला पाहिजे त्या पद्धतीने काम होत नाही. याच परिस्थितीवरती भाष्य केलेल्या एका पुस्तकाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. ॲमेझॉन वरील पुस्तकाच्या माध्यमातून विरोधकांनी उपहासात्मक पद्धतीने मोदींवर टीका केलीय.

या पुस्तकाचं नाव “मास्टरस्ट्रोक : ४२० सिक्रेट्स दॅट हेल्पड पीएम इन इंडियाज इम्पॉयमेंट ग्रोथ” असं असून हे पुस्तक अ‍ॅमेझॉनच्या साईटवर अपलोड करणाऱ्याने आपलं स्वत:चं नाव बेरोजगार भक्त असल्याचं म्हटलं आहे. मजेची गोष्ट म्हणजे या पुस्तकात 56 कोरी पान आहेत. रेडइटवरील एका युझरने हे पुस्तक अ‍ॅमेझॉनच्या किंडल प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्याचा दावा केलाय.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.