
‘अव्वल आलेल्यांना शुभेच्छा’ म्हणत मोदींच्या लोकप्रियतेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बोचरी टीका!
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली नाही यामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.
यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत याबाबतीत मात्र आपलं नाणं खणखणीत अशी बोचरी टीका केली आहे.
अमेरिकेतील ‘द कॉन्व्हर्सेशन’ वेबसाइटने ट्विटरवर जनमत चाचणी घेतली. कोरोना काळात सर्वांत सुमार कामगिरी करणारे नेते कोण, यावर चाचणी झाली. या चाचणीत मोदींचं नाणं खणखणीत वाजलं. सर्वांत वाईट कामगिरीसाठी त्यांना एकूण (७५,४५०) ९० टक्के मतं मिळाली.
काही दिवसांपूर्वी ‘द डेली गार्डियन’ या लोकल वृत्तपत्राला ग्लोबल भासवून मोदी कसे चांगले काम करतात, हे दाखवायचा प्रयत्न भाजपने केला. त्या तुलनेत ‘द कॉन्व्हर्सेशन’ हे वृत्तपत्र मोठं आहे. त्यामुळे दखल घेणं क्रमप्राप्त ठरतं. या चाचणीत अव्वल आलेल्यांना शुभेच्छा!
अशा आशयाचे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.