आमदार त्यांच्या निधीतील १ कोटी रुपये कोविड व्यवस्थापनासाठी खर्च करू शकतात,अजित पवारांची घोषणा

0

राज्यात वाढत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनान निर्बंध लावण्याबरोबरच समाजातील काही घटकांसाठी आर्थीक मदत जाहीर केली आहे त्यासाठी जवळजवळ ५०००कोटीच पॅकेज जाहीर झाल आहे.कोविड परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कोविड सेंटर, बेड, व्हेंटिलेटर्स, रेमेडिसेव्हर, कोरोना रुग्णांचा आहार या सर्व बाबींच्या खर्चाची तरतूद करावी लागत आहे.स्थानिक पातळीवरही आमदारांनी निधी वाढवून तो कोरोनासाठी खर्च करण्याची मागणी केली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निधीबाबत चर्चा करत आमदारांना निधी वाढवून देण्याचा निर्णय घेतला असून त्यातील १कोटीची रक्कम स्थानिक पातळीवर कोरोना परिस्थिती पाहून त्यासाठी खर्च करण्याची परवानगी दिली आहे.अनेक आमदारांनी याबाबत अजित पवारांना विनंती केली होती,स्थानिक पातळीवर त्यांना कोविडवर उपाययोजना करण्याची इच्छा होती.आमदार आता रुग्णवाहिका, बेड, व्हेंटिलेटर्स स्थानिक गरज पाहून त्यांच्या निधीतून खर्च करून देऊ शकतात.

दरम्यान राज्यात काही ठिकाणी अत्यावश्यक सेवाही बंद करण्याची वेळ आली आहे.कोरोना मृत्युदर वाढत असून वेळीच कोविड साखळी तोडण गरजेच ठरलेल आहे.लहान मुलांत ही साथ पसरल्यास गंभीर परिस्थिती होऊ शकते.सध्याही तरुण मृत्यू वाढले असून ही बाब चिंताजनक आहे.तरुणाई आणि लहान मुल यांच्यात अजून लसीकरणही झालेल नाही.परिणामी राज्यसरकारन कडक लॉकडाऊन लावावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.