
सध्याच्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराने केलेल्या कार्याचा गौरव विरोधातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी करणे ही फार मोठी गोष्ट आहे.
आमदारांनी वेळोवेळी आरोग्य विभाग व प्रशासनाला काय हवं काय नको याची विचारपूस करत नागरिकांच्या साठी तत्पर राहिले त्यांच्या कामाची पोचपावती म्हणजे विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांनी. केलेला गौरव होय.
कोपरगाव तालुक्यातील रुग्णसंख्या मोठ्या संख्येने वाढत होती काही नागरिकांनी जीव सुद्धा कामावर अशा परिस्थितीमध्ये आदर्शवत असे काम करून आमदार आशुतोष काळे यांनी चांगली व्यवस्था निर्माण केली यामुळे रुग्ण संख्येला आळा बसला. त्यांनी उभा केलेले.
आपला उदात्त दृष्टिकोन ठेवत ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांटची व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यात केलेली ऑक्सिजन निर्मिती यावरून त्यांचे कार्य आपल्या निश्चित लक्षात येते. प्रामाणिक हेतूने केलेले कार्य लक्षात घेत भाजपचे पदाधिकारी यांनी मोठ्या मनाने राष्ट्रवादीच्या आमदाराचे केलेले कौतुक हे त्यांच्या कामाची पोचपावती आहे.