आमदार रोहीत पवार दिल्ली दौरा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याशी चर्चा

0

राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील सुविधांची पूर्तता करणे आणि नूतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची भेट घेतली आहे.रोहित पवार यांनी नवी दिल्लीत जाऊन निर्मला सीतारमन यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा केली. कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक प्रभाव हा असंघटीत क्षेत्रातील महिला आणि कामगारांवर पडला. याच धर्तीवर शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक आणि खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्यासाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा, अशी मागणी रोहित पवारांनी केली.

कर्जत जामखेड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शासनाच्या मदतीने सावकारकीला आला घालण्याचा प्रयत्न केला जातोय. या परिस्थितीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार याठिकाणी अधिक प्रमाणात वाढावे अशी विनंतीही रोहित पवार यांनी अर्थमंत्र्यांना केली. तर यावर, शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम राबविण्याबाबत आणि कर्जत- जामखेडमध्ये इतर आर्थिक घडामोडी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकाधिक व्यवहार वाढण्यासाठी नवीन बँकाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी निर्मला सीतारामण यांनी दिल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

दरम्यान रोहीत पवार यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातील कोरोना परिस्थितीत भरडलेल्या अनेक कामगार तसेच व्यावसायिक यांच्यासाठी सर्वोपतरी मदत करण्याच धोरण आखण्याच्या दृष्टीने अर्थमंत्र्यांशी चर्चा केल्याच दिसून आल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.