
आ.रोहित पवारांचे कोरोना रुग्णांशी हितगुज!
महाराष्ट्रात विविध क्षेत्राशी निगडीत आ.रोहित पवार संपर्क ठेवत असतात. सध्याच्या परिस्थिती मध्ये रोहित पवार लोकांच्या सहकार्यासाठी अहोरात्र धावपळ करताना दिसून येत आहेत. त्यांनी काल अहमदनगर येथील ऑक्सिजन प्लांट ची पाहणी केली. त्याच बरोबर त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन तिथल्या माहितीचा सविस्तर आढावा घेतला.
“कोविड रुग्णांचा सर्वाधिक ताण जिल्हा रुग्णालयावर असल्याने इथं कशाचीही कमी पडणार नाही,असा माझा प्रयत्न असतो. त्यानुसार काल जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन प्रशासनासोबत तिथल्या व्यवस्थेचा आढावा घेतला.यावेळी तिथं दाखल असलेल्या कोविड रुग्णांचीही भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली”. अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.
महत्वाचे म्हणजे त्यांचा जिल्ह्याच्या विविध गोष्टींच्या बाबतीत कायम आढावा असतो. ज्या गोष्टींची कमतरता वाटते त्या देण्याचा त्यांचा चांगल्या प्रकारे प्रयत्न असतो. जिल्हा रुग्णालयाच्या भेटी मध्ये त्यांनी नागरिकांना भेट देऊन त्यांच्या समस्या समजून घेतल्या व त्यांच्या सोबत संवाद साधला!