मी शब्दाचा पक्का, निलेश लंके यांनी दिलेला “हा” शब्द पाळला!

0

निवडणूक काळात आश्वासनांची खैरात वाटली जाते. निधींची बरसात केली जाते. मात्र दिलेले आश्वासने पूर्ण करणारी माणसं लोकं स्वतः हुन नेतृत्व म्हणून शोधत व स्वीकारत असतात.

मागील काळात ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध करा आणि निधी मिळवा अशी खूप साऱ्या नेत्यांनी वल्गना केली होती. आता मात्र निलेश लंके यांनी दिलेला शब्द पाळत कामाला सुरुवात केली आहे. कामाच्या बाबतीत दमदार आमदार म्हणून राज्यात ते सर्वपरिचित आहेत.

बिनविरोध निवडणुकींसाठी गावांना प्रोत्साहन म्हणून जाहीर केलेला 25 लाख रुपयांचा निधी निलेश लंके यांनी दिलाय. तसेच त्यांनी वक्तव्य केलं की “मी वाचाळवीर नाही, तर शब्दाचा पक्का आहे”. ज्या गावाने प्रतिसाद दिला निवडणूक बिनविरोध केली होती त्या गावांना मी निधी देऊन वचनपूर्ती केली आहे असे ते म्हणाले.

गावातील सुशोभीकरण, सभामंडप, रस्त्ये, सांस्कृतिक भवन अशा गोष्टींच्या साठी हा निधी वापरता येणार असल्याने जनता आ.निलेश लंके यांच्यावर भलतीच खुश आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.