
आ.निलेश लंके ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन’ या सन्मानाने सन्मानित!
पारनेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश लंके यांना जागतिक दर्जाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली आहे त्यांनी केअर सेंटर च्या माध्यमातून दहा हजारापेक्षा जास्त रुग्णांना आरोग्य सुविधा दिली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मधून त्यांच्या कोविड केअर सेंटरची जोरदार चर्चा झाली इतकेच नव्हे तर कोविड केअर सेंटर चालविण्यासाठी जगभर त्यांना आर्थिक मदत करण्यात आली.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना आज मुंबई येथे ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.याबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होताना दिसून येत आहे. हा पुरस्कार मिळवणारे निलेश लंके हे पाहिले अा. आहेत अशी माहिती मिळाली आहे