
या महत्त्वाच्या गोष्टीसाठी आमदार निलेश लंके आणि आमदार रोहितदादा आले एकत्र !
सध्या महाराष्ट्रात तरुण आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांची जोरदार चर्चा आहे. या दोघांनी आपल्या आपल्या मतदारसंघात केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाची चर्चा राज्यात सतत सुरू असते. दोघांचीही ही आमदारकीची पहिलीच टर्म आहे. तरुणांच्या मनातील ताईत असणारे हे दोन्ही आमदार आपल्या कामाच्या जोरावर खूपच स्पेशल आहेत. आमदार कसा असावा याचा आदर्श म्हणून अा. रोहित पवार आणि आ. निलेश लंके यांचे नाव आवर्जून घेतले जाते.
आज अहमदनगर एम.आय.डी.सी मधील ऑक्सीजन प्लांटला कर्जत-जामखेडचे आमदार मा.रोहितदादा पवार यांनी व आ.निलेश लंके यांनी भेट दिली. ऑक्सिजन निर्मितीच्या संदर्भात त्यांनी विविध माहिती घेतली. सोबतच त्यांची इतर विषयांवर सुद्धा चांगलीच चर्चा रंगली. दोन तरुण आमदारांची ऑक्सिजन प्लांट ला भेट पाहून अहमदनगर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील लोकांच्या चांगल्याच भुवया उंचावल्या ची चर्चा सुरू आहे.