
आमदार भास्कर जाधव यांना अखेर सुरक्षा, अधिवेशातील राड्यानंतर गृह खात्याचा निर्णय!
दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनातील पहिल्याच दिवशी सभागृहामध्ये जो काही प्रकार घडला त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले होते. याच प्रकरणावरून भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले. अध्यक्षांच्या दालनात आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला होता. त्यानंतर अखेर जाधव यांना दोन सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत. अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतर महाविकास आघाडीनं जाधव यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
भास्करराव जाधव विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशना नंतर चांगलेच प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. उद्या महाराष्ट्रात भास्करराव जाधव यांच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली आहे सोशल मीडियावर ती सुद्धा त्यांचं चांगलेच समर्थन केले जात आहे. मात्र सभागृहातील जाधव यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे त्यांना सोशल मीडियातून धमक्या येत आहेत असा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर गृह खात्याने भास्कर जाधव यांना दोन सुरक्षा रक्षकांकडून सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.