मेहंदीमध्ये मिसळा ही एक वस्तू आणि केह गळती थांबवून केह करा काळे

0

स्त्रिया सध्या वेगवेगळे हेअर कट आजमावतात. हे हेअर कट सुंदर दिसतात. परंतु लांब केसांची परंपरा स्त्रियांचे सौंदर्य वाढवते. केसात कोंडा होणे, केस पांढरे होणे, केस गळणे या केसांच्या काही प्रमुख समस्या असून या समस्यांवर बाजारात विविध उपचार उपलब्ध आहेत हे सर्व केमिकल उपाय असून याचे साईड इफेक्ट होतात. केस काळे करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डायमुळे रॅशेस, पुरळ, डोळे लाल होणे अशा समस्या आढळतात. आपण आज मेहंदी आणि जास्वंदीची फूल उकळून घरगुती डाय बघणार आहोत.

परंपरागत जास्वंदीची फूल चई म्हणजेच टक्कल पडल्यास तेलात उकळून ते तेल डोक्याला लावतात. आज आपण जास्वंदीची फूल आणि पान वापरून घरगुती डाय करणार आहोत.
साहित्य
१) मेहंदी – १ पाकीट
२) जास्वंदीची फूल व पाने – २ व ५
३) चहापूड – अर्धा चमचा


कृती
१ कप पाणी पातेल्यात घ्या, त्यात जास्वंदीची फूल व पान घाला आणि मंद गॅसवर उकळत ठेवा. त्यात चहापूड टाका व साधारण तीन मिनिटांनी गॅस मीडियम करा. फुलांचे हे पाणी किमान ७ मिनिटे उकळा. पाण्याचा रंग काळसर होईल, हे पाणी गाळा व कोमट करून मेंदीत मिसळा. मेहंदी साधारण रात्रभर भिजवा, कारण आॅक्सीडीकरण होऊन रंग चांगला येतो. आता मेहंदी संपूर्ण केसांना लावा. व साधारण २ तास ठेवा व रिठ्याने धुवून टाका. तुमचे केस तर काळे होतीलच पण केस गळतीची समस्या संपून जाईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.