या महिला बचत गटांना व्यवसायासाठी मिळणार २ लाख कर्ज अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली घोषणा!

0

महिलांचे आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण झाले पाहिजे. महिलांना आर्थिक दृष्ट्या साक्षर होता आले पाहिजे या दृष्टीने महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन अधिकाधिक बळकटीकरण करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. कुटुंबाच्या बरोबरच लहान मोठे व्यवसाय उभा करण्याच्या साठी बचत गटाच्या माध्यमातून सहाय्य करण्यात येते.

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत राज्यातील अल्पसंख्याक समाजातील महिला बचतगटांना व्यवसायासाठी २ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार असून अल्पसंख्याक महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक यांनी दिली.

योजनेचे अर्ज मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. महामंडळाच्या https://t.co/AIZ3Napu77 या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख २० जुलै २०२१ आहे, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

महिलांच्या उन्नतीच्या दृष्टिकोनातून हा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने हे पाऊल टाकले असल्याचे दिसून येत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.