
महाराष्ट्राचे कृषिमंत्री; सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माहिती घेतली!
महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे हे सातत्याने शेतीच्या बाबतीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवताना दिसून येतात. खोट्या बी बियाण्यांच्या बाबतीत त्यांनी ग्राउंड वरती जाऊन काम केलं आहे. तसेच सध्याही ते शेतकऱ्यांच्या बांधावरती जात बारकावे समजून घेत जबाबदार कृषिमंत्री म्हणून काम करत आहेत. मालेगाव तालुक्यातील श्री गंगाराम शिरोळे यांच्या शेताला त्यांनी भेट दिली व त्याठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
ट्विट करत दादा भुसे यांनी माहीती दिली आहे की “मालेगांव तालुक्यातील पांढरून शिवारातील श्री.गंगाराम शिरोळे यांच्या शेतात भेट देऊन कोबी पिकाची पाहणी केली. तसेच, येथील स्थानिक शेतकरी बांधवांशी कृषि विषयक बाबींवर चर्चा केली”. राज्याचे कृषिमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावरती जात माहिती घेत काम करत आहेत ही सकारात्मक बाब आहे.