म्यानमारमध्ये लष्करी दडपशाहीचा कडेलोट 89 आंदोलकांचा मृत्यू

0

म्यानमार : म्यानमारमध्ये सख्या लोकशाहीचे धिंडवडे निघत असून लष्काराने उठाव करून लोकशाही पध्दतीने निवडून आलेल्या आंग सांग सू यांची सत्ता उलथवून टाकत देश ताब्यात घेत लष्करी राजवट लागू केली आहे.याला जनतेचा विरोध असून मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहेत.म्यानमारमध्ये गेल्या महिन्याच्या सुरुवातीपासून लष्कराने उठाव केला आहे व त्याविरोधात आंदोलक लोकशाही स्थापनेसाठी आग्रह धरत आहेत.लष्कराविरोधी असहकाराच धोरण जनतेत असून लष्कराने सांगितलेली कोणतीही बाब आंदोलक ऐकण्यास तयार नाहीत.परिणामी लष्कर हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे.यात आंदोलकांची धरपकड सुरू आहे.

शनिवारीही आंदोलनकर्ते आणि लष्करात जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळत असून रंगून शहरात मोठ्या प्रमाणावर आंदोलक जमा झाले याच दिवशी म्यानमारचा ‘आर्मी फोर्सेस डे’होता. मोठ्या प्रमाणावर लष्कर आणि आंदोलक यांच्यात धुमश्चक्री झाली व 89 आंदोलकांचा मृत्यू झाला ज्यात लहान मुलांचाही समावेश आहे.लष्काराच्या या दडपशाही भूमिकेचा युरोपियन युनियन, युके, अमेरिका यांनी निषेध व्यक्त केला आहे.लष्कराकडून निशस्त्र नागरिकांची हत्या हे असंवेदनशील असल्याच त्यांनी सांगितले आहे.

लष्कर प्रमुख मिन आंग लाईंग यांनी शनिवारी नॅशनल चॅनेलवर सध्याच सरकार गैरपध्दतीने काम करत होत परिणामी उठाव करून सरकार उलथवून टाकाव लागल अस त्यांनी सांगितल,तसेचलोकशाहीच रक्षण करेन असही सांगितल होत, देशात पुन्हा निवडणुका होतील असही त्यांनी स्पष्ट केले केल होत.परंतु या घटनेनंतर त्यांच्या म्हणण्याला हरताळ फासला गेला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.