भाषण सुरू असतानाच अमोल मिटकरीना अर्धांगवायू चा सौम्य झटका, उपचाराच्या नंतर प्रकृती स्थिर!

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य असलेले अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिंगणा कार्यक्रमांमध्ये बोलत असताना दुपारच्या वेळी अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. या झटक्याचा नंतर सगळीकडे एकच गोंधळ उडाला होता. अमोल मिटकरी यांना तात्काळ आयकॉन हॉस्पिटल येथे उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.

आता अमोल मिटकरी यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याची कसली बाब नाही. स्वतः अमोल मिटकरी यांनी या बाबतीत माहिती दिली. तसेच ते म्हणाले की स्वतःचा जीव धोक्यात घालून कृपया मला भेटायला येऊ नका असे त्यांनी कार्यकर्त्यांना मित्रमंडळींना आवाहन केले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.