मेरे करण अर्जुन आयेंगे फेम राखी गुलजार करतेय शेती

0

शर्मीली चित्रपटात डबलरोल करणार्या राखीने त्या काळातील सर्व सुपरस्टार हिरोबरोबर काम केल. निळ्या डोळ्यांच्या या नटीने रसिक प्रेक्षकांना भुरळ घातली होती. जुर्माना चित्रपट अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे तर ब्लॅकमेल चित्रपटाने उत्पन्नाचे रेकाॅर्ड मोडले होते. राखीने वयोमानानुसार चरित्र भूमिकाही केल्या तिची करण अर्जुन चित्रपटातील आईची भूमिका अत्यंत गाजली. सध्या राखी काय करते चला बघूया.

राखीचा जन्म १५ आॅगस्ट १९४७ साली वेस्ट बंगाल राणाघाट येथे झाला. वयाच्या २० व्या वर्षी राखीने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. बच्चनबरोबरचे तिचे चित्रपट खूपच गाजले. विशेषत: मुक्कदर का सिंकदर. राखीने लेखक गुलजार यांच्याशी विवाह केला असून तिला दोन मुली आहेत. पैकी मेघना गुलजार दिग्दर्शक आहे. राखी सध्या अलिप्त जीवन जगत असून तिने शेती करायला सुरुवात केली आहे.

राखी सध्या ७३ वर्षांची असून तिने फिल्म इंडस्ट्रीपासून दूरी बनवली आहे. पनवेलमध्ये फार्म हाऊसवर ती आपला वेळ घालवत आहे. राखी पूर्णपणे शेतकरी झाली असून गाई, म्हशींसह तिने अनेक पाळीव प्राणी पाळलेले आहेत. या प्राण्यांची देखभाल ती स्वता करते. गुरांचा चारा पाणी बघते. एकेकाळी फॅशन आणि ग्लॅमरने नटलेली ही नटी सध्या अत्यंत साध जीवन जगत आहे. शेवटी माणस मूळाकडेच जातात हेच या उदाहरणावरून दिसून येते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.