पुरुषांना स्त्रियांतील या ५ गोष्टी करतात आकर्षित

0

संपूर्ण जग आवड आणि नावड या मूलभूत गरजेवर उत्पादनांची निर्मिती करत असते. सौंदर्य जितक पुरुषाला आवडत तितकीच सादगीही त्याला भावते. कणखर, कुटुंबाची जबाबदारी घेणारा, बेधडक, राकट हे पुरुषाचे गुण सांगितले जातात आणि खूप स्त्रिया त्यावर भाळतात. पुरुषही स्त्रीत केवळ देखण शरीर बघतो हा समज कालानुरूप बदलत असून बदलेल्या मानसिकतेनुसार स्त्री जर सालस आणि दिर्घोद्यगी असेल तर पुरुषाला आवडते. स्त्री आणि पुरुष काही बाबतीत अगदी भीन्न विचार करतात किंबहुना पुरुषांना जबाबदारी प्रथम असे होत असल्याने मन कणखर कराव लागत. परंतु पुरुषही आतून हळवा असतो. चांगला, भाऊ, बाप, नवरा अस बनण्याची त्याची तळमळ असते.

स्त्री, पुरुष शरीर आकर्षण, विवाह आणि नवनिर्मिती हे सूत्र ठरलेल आहे. पुरुषाला भावनिक गरज आयुष्यभर असते त्यामुळे त्याला समजून घेणारी स्त्री त्याच्या मनात जागा निर्माण करते. पुरुषाला देखणी स्त्री आवडते, परंतु बरेचदा त्याच ह्रदय एखादी सावळी जिंकते. आई, बहिण, मावशी या नात्यातील स्त्रियांचा तो आदर, माया करत आलेला असतो. प्रेयसी म्हणून एखादीची निवड करताना एखादी भेट होण आणि त्यातच तीच भावण अस होत. भावनेन तो तिच्यात गुंततो. भेटाव, बघाव, बोलाव वाटण मनापासून सुरू होत याला मिळणारा प्रतिसाद फारच महत्वाचा असतो. प्रेम, आकर्षण ही युवा अवस्थेतील टाळता न येणारी बाब आहे. समजदार पुरुष ती व्यवस्थित हाताळत स्वताच करीअर, कुटुंब, तिच कुटुंब तिची यांची जबाबदारी घेत पुढे जातो.प्रेम यशस्वी करतो. परंतु हे एकतर्फी असेल तर तो चिडचिडतो, ताण वाढतो. त्याच्या बरोबरीन नाही पण त्याला स्वास्थ्य देणारी स्त्री असेल तर तो उत्तम प्रगती करतो. चला बघूया पुरुषांना स्त्रियांत आवडणार्या ५ गोष्टी

१) आत्मविश्वास – अत्मविश्वास असणारी व देणारी स्त्री पुरुषाला आवडते.
२) बुध्दीमान – शैक्षणिक बुध्दीमान, किंवा चतुराईने घर चालवणारी स्त्री पुरुषाला आवडते.
३) आकर्षक डोळे – आकर्षक, मोठे, घारे, पाणीदार किंवा भावपूर्ण डोळे असणारी स्त्री पुरुषाला आवडते.
४) दिलेला शब्द पाळणारी – वेळेवर येणारी, आवरणारी, शब्द पाळणारी सात्री त्याला आवडते.
५) धडाडी – एखादा निर्णय घेऊ शकणारी, पुढाकार घेणारी, धडाडीन नोकरी करणारी स्त्री पुरुषाला आवडते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.