शवावहिनीची धूर ओकेनारी चिमणी लाल झाली हे भाजपला दिसले नाही – मेहबूब शेख

0

राष्ट्रवादी युवक काँग्रेस सध्या चांगलीच आक्रमक झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी चांगलीच भाजप ची ट्विटरच्या मुद्द्यावरून पिसे काढली आहेत.

मेहबूब शेख यांनी ट्विट करत म्हणाले की “कोरोनाने मृत्यू झालेल्या लोकांना अंत्यविधी साठी शवावहिनी मध्ये नेण्यात आले. मृत्यूचे प्रमाण इतके जास्त होते की शवावहिनीची धूर ओकेनारी चिमणी लाल झाली हे भाजपला दिसले नाही; मात्र भाजपला ट्विटरची चिमणी मात्र दिसली. भाजपला सगळे सोयीचे दिसते”.

अशा आशयाचे त्यांनी ट्विट करत भाजप सरकार लोकांच्या मृत्यू कडे सोयीस्कर दुर्लक्ष कसे करत आहे या कडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.