
काँगेस नेत्यांची वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर बैठक
राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत असून राज्यात लॉकडाऊन करायचा का? नाही या विजयासह विविध विषयांवर काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.राज्यात महाविकास आघाडी असून काँग्रेसही सत्तेचा एक भाग आहे.दरम्यान तिन्ही पक्षात एकमत होत नसल्याने राज्यात लॉकडाऊनचा निर्णय होत नाही अशी टिका विरोधी पक्ष करत होता.यावर उत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यात लॉकडाऊन नको अस काँग्रेसचे मत असून त्यानुसार काय उपाययोजना कराव्या यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली.प्रादुर्भाव वाढल्यास काय करता येईल यावरही चर्चा झाली.
दरम्यान अनेक काँग्रेस नेते, संजय राऊत यांच्यावर नाराज असून सगळ्यांनी त्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना नाराजी व्यक्त केली.संजय राऊतांनी मध्यंतरी युपीए चा अध्यक्ष काँग्रेस बाहेरचा करावा अस विधान केल होत.या विधानावर सर्वच काँग्रेस नेते नाराज असून सोनिया गांधी किंवा राहुल गांधी या पदासाठी योग्य असल्याच त्यांनी निक्षून सांगितल.निधी व महामंडळ वाटपा बाबतही चर्चा झाली असून काँग्रेसच्या प्रभारींनी काँग्रेस मंत्र्यांना निधी कमी मिळत असल्याची तक्रार केली.किमान समान कार्यक्रमा अंतर्गत सर्व कार्यक्रम पार पडावेत असेही सांगितले.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत विचारले असता त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना सध्या विश्रांतीची गरज असल्याचे ते म्हणाले तसेच त्यांच नेहमीच मार्गदर्शन राहील आहे असही ते म्हणाले.