माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांची भाजप प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड

0

माथाडी कामगार नेते व सातारा जिल्ह्याचे सुपूत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची आज दि. 2 एप्रिल रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबतचे पत्र दिले आहे.

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील नरेंद्र पाटील यांची सुरूवात राष्ट्रवादी पक्षातून सुरूवात झाली. त्यानंतर गेल्या पंचवार्षिक लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर छ. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढविली. परंतु केवळ मतदार संघ शिवसेनेचा असल्याने नरेंद्र पाटील यांनी धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढविली, मात्र त्यांना संपूर्ण पाठिंबा हा भाजपाचाच होता. शिवसेना – भाजप युती तुटल्यानंतर ते काही दिवसातच भाजपात गेले.

मराठा आरक्षणावरून नरेंद्र पाटील यांनी नेहमीच महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाची भूमिका लोकांच्यासमोर मांडली. माथाडी कामागाराचे अध्यक्षपदही अशोक चव्हाण तसेच महाविकास आघाडी सरकारवर टीका केल्यानेच गमवावे लागले. मात्र तरीही नरेंद्र पाटील यांनी भारतीय जनता पक्षाची भूमिका सोडली नाही. आज गुढीपाडव्याच्या दिवशी नरेंद्र पाटील यांना उपाध्यक्षपदी निवड केल्याने कार्यकर्त्याच्यात आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.