
मराठी कलाकार मैदानात!
मराठी कलाकार रुग्णांच्या मदतीसाठी आता मैदानात उतरले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी लोकांना मदत मिळवून देण्याच्या पोस्ट केल्या आहेत. प्रसिध्दी साठी हा वापरला जाणारा प्लॅटफॉर्म आता मदतीसाठी वापरला जातो आहे ही सकारात्मक बाब आहे.
मराठी अभिनेता स्वप्नील जोशी यांनी “सोशल मीडियाचा वापर आपल्याला कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठी करायचा आहे. काही दिवस सोशल मीडियावर मनोरंजनाशी संबंधित पोस्ट करणार नाही. आपण प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायला हवा. सोशल मीडिया चांगल्या कामासाठी वापरणं, हा माझा खारीचा वाटा आहे. चला ही लढाई एकत्र लढू या आणि एकत्र जिंकूया”. अशी प्रतिक्रिया देत सर्वांचेच लक्ष वेधून घेत माणुसकीचे दर्शन करून दिले आहे.
याच बरोबर तेजस्विनी पंडित यांनी पण मदतीसाठी कित्येक ट्विट करत मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. याच बरोबर तरुण मराठी दिग्दर्शक अक्षय इंडीकर हे सुध्दा मदती साठी पुढाकार घेताना दिसत आहेत.
चित्रपट कलाकार, दिग्दर्शक माणुसकीच्या दृष्टीने भूमिका घेतांना दिसत आहेत. लोकांना आधार देत आहेत ही फारच जमेची बाजू आहे. चांगले माणुसकीचे दर्शन त्यांनी घडवल्याने लोकांतून सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.
खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.