मराठा आरक्षण; माहूरगड येथील मुस्लीम युवकांनी मोदींना पाठवले मागणी करणारे दहा हजार पत्र!

0

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. इथला समाज खांद्याला खांदा लावून एकमेकांच्या सुख दुःखात खंबीरपणे उभा राहत असतो. जाती-धर्माच्या भिंती नाहीशा करत एक माणूस म्हणून एकमेकांना सांभाळून घेताना सर्व जाती धर्मातील लोक दिसून येतात. असाच काहीसा अनुभव माहूरगड येथील मुस्लिम समाजातील युवकांनी दहा हजार पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पाठविल्यानंतर आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी अशी मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या अंतर्गत लाखो पत्र महाराष्ट्रभरातून पाठविण्यात आली आहेत. या मोहिमेमध्ये आपणही खारीचा वाटा उचलावा असा विचार करत माहूरगड येथील मुस्लीम समाजातील युवकांनी तब्बल दहा हजार पत्रे पंतप्रधान कार्यालयास पाठविली आहेत.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी ट्विट करत म्हटले आहे की “महाराष्ट्रात मोठा भाऊ असणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून माहूरगड येथील मुस्लिम युवकांनी १० हजार पत्र लिहून नरेंद्र मोदींना “एक पत्र मराठा युवकांच्या उज्वल भविष्यासाठी“ या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मोहिमेतून पाठवले आहेत.सर्व समाजातून या मागणीला उदंड प्रतिसाद मिळत आहे”! असे ट्विट केले आहे.

सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकमेकांचा हात हातात घेत एकमेकांच्या प्रश्नांसाठी खंबीरपणे उभा राहणे ही खऱ्या अर्थाने माणुसकी आहे. पुढील पिढ्यांच्या साठी हा निश्चित आदर्श पायंडा असेल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.