
मराठा आरक्षण! संभाजी राजे पंतप्रधानांच्या भेटीसाठी वर्षभरापासून ‘वेटिंगवर’; त्यांना वेळ का दिली नाही?
महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे संकट असतानाच मराठा आरक्षणाच्या बाबतीत आज सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय फेटाळला आहे. महाराष्ट्रात बहुतांश मराठा समाज हा शेतकरी, कष्टकरी, लढवय्या असा समाज आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला होता असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले.
काय तर म्हणे, महाराष्ट्र सरकारला या आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही. गायकवाड समितीच्या शिफारशींबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयासही सर्वोच्च न्यायालयाने केराची टोपली दाखवली आहे. महाराष्ट्राची विधानसभा सार्वभौम आहे व सरकार हे लोकांचा आवाज आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला कशी दुय्यम वागणूक देत आहेत त्यावर लक्ष केंद्रित करत मुख्यमंत्री म्हणाले, “छत्रपती संभाजीराजे हे गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधानांची वेळ मागत आहेत, त्यांना पंतप्रधानांनी का वेळ दिली नाही?, मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार पंतप्रधानांना आहे म्हणून हा प्रश्न,”असेही ते म्हणाले. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वातावरण हे खूपच तापले आहे. महाराष्ट्रातील जनतेने लाखोंच्या संख्येने सहभागी होत मराठा क्रांती मोर्चे काढले होते. या मुद्द्यावर राज्यसरकार चांगलेच आक्रमण झाल्याचे दिसून येत आहे.