भेगा पडलेल्या टाचा करा मुलायम सुंदर

0

भेगा पडलेल्या टाचा सौंदर्यात बाधा आणतात तसेच त्या दुखतातही या टाचांवर आपण आज एक घरगुती क्रिम तयार करणार आहोत. टाचांना भेगा पडण्याची समस्या दिर्घकालीन असल्यास त्यात घाण जाऊन बसते. परिणामी टाच् घाण दिसतात. तसेच भेगांजवळील मांस फाटल्याने तिथे वेदना होतात. काहीवेळा हे प्रमाण वाढल्यास जखमाही होऊ शकतात. या भेगा पडलेल्या टाचांना सुंदर, मुलायम केल्यास त्यातील वेदना संपून टाचा सुंदर दिसतात.

साहित्य :
१) कोरफड गर – १ चमचा
२) मेणबत्ती वॅक्स – ४ चमचे
३) मोहरी तेल – १ चमचा
४) खोबरेल तेल – २ चमचे

कृती :
मेणबत्ती चिज चाळणीवर खीसा, साधारण ४ चमचे खीस झाला पाहिजे. आता यात १ चमचा मोहरीच तेल, एक चमचा खोबरेल तेल, कोरफड गर एक चमचा मिक्स करा. गॅसवर छोट पातेल गरम करायला ठेवा वॅक्स वितळेल. वऽक्स व कोरफड तसेत दोन तेल यां मिश्रण दो ते तीन मिनिटे गॅसवर गरम करा. आता मिश्रण एका स्टीलची डबीत ओता आणि गार करा तुमच घरगुती क्रिम तयार आहे.

किमान सात दिवस हा उपाय करायचा आहे. पायाला क्रिम लावण्यापूर्वी मोठ पातेल पाणी गरम करून त्यात सोडा तसेच मीठ घाला या पाण्यात पाय ठेवून पाय शेका तसेच खराब टूथ ब्रशने पायाला जिथे भेगा आहेत त्यातील घाण खरडून दूर करा. किमान ७ मिनिटे पाय पाण्यात बुडवून ठेवा. पाय बाहेर घ्या व स्वच्छ पुसून घ्या. आता तयार केलेल क्रिम टाचांच्या भेगात भरा तसेच संपूर्ण टाचांना लावा. हा उपाय किमान सात दिवस करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.