न उकडता न वाळवता १० मिनिटात बनवा झटपट बटाटे वेफर्स

0

उन्हाळी वाळवणात बटाटे वेफर्स आवर्जून केले जातात. बटाटे वेफर्स बनवण्यासाठी ते गरम पाण्यात घालून नंतर ते उपसून कडक उन्हात वाळवावे लागतात. या सर्व प्रोसीजरमध्ये वेळ व श्रम लागतात. परंतु काहीवेळा घरच्या घरी जरी झटपट वेफर्स बनवायचे असतील तर आपण ते पार्टीसाठी, दुपारच्या स्नॅक्ससाठी बनवू शकतो. बटाटे वेफर्स बनवण्याची ही पध्दत अत्यंत सोपी व कमी वेळात होणारी आहे तसेच याने कुरकुरीत वेफर्स तयार होतात.

पार्टीसाठी किंवा चहासाठी वेफर्स बनवताना प्रथम बटाटे धुवून सोलून घ्या. सोललेले बटाटे चिप्सच्या साच्यावर खिसून चिप्स पाडून घ्या. पाडलेले चिप्स मिठाच्या थंड पाण्यात घाला, हे चिप्स साधारण दोन ते तीनवेळा गार पाण्याने धुवून घ्या.

जेणेकरून चिप्सवरील स्टार्च निघून जाईल. आता हे चिप्स एका कॉटन कपड्यावर पसरा व वरून दुसर्या कपड्याने ओले चिप्स टिपून घ्या. गॅसवर कढई ठेवून त्यात तळणीसाठी तेल घाला. तेल तापल की, त्यात एकेक चिप्स सोडा. मिडीयम फ्लेमवर चिप्स तळून घ्या. कुरकुरीत चिप्स तयार आहेत.

वरील बटाटे चिप्स बनवताना बटाटे आकारा व माणसांच्या संख्येनुसार घ्या. साधारण ३ ते ४ बटाटे ४ माणसांना पुरतात.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.