
पारंपारिक पध्दतीत साईला दह्याचे विरजण लावून त्यापासून लोणी व नंतर तूप बनवले जाते. परंतु साईपासून लोणी तयार करण्याची एक पध्दत असून त्याला चिनी अस म्हणतात. या पध्दतीने लोणी काढल्यास लोण्याचा उतार जास्त पडतो तसेच तूपही जास्त निघते. या पध्दतीत वेळही कमी लागतो. फक्त साईपासून लोणी बनवताना साय जास्त असण्याची गरज असते ही साय तुम्ही फ्रीजरला साठवून ठेवू शकता.
किमान १ लिटर दुधाची आठ दिवसाची साय साठलेली असावी अशी साय फ्रीजमध्ये स्टोअर करा. लोणी काढायच्या वेळी साय रूम टेपरेचरला आणा व त्याला एका चमच्याच्या सहाय्याने एकाच बाजू फिरवा, साधारण सात ते आठ मिनिटात लोणी वर येईल. वर आलेले लोणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. आता गोळा ज्या पातेलात तूप कढवायच त्यात घाला.
गॅस मीडियम फ्लेवर ठेवून लोणी वितळून घ्या. वितळलेल्या लोण्याचा तूप करून घ्या. हे लोणी लगेचच तयार होत असून त्यापासून तूपही लगेचच निघत.