फक्त दूध आणि बिस्कीट यांपासून बनवा बाजारासारखी क्रिमी आयस्क्रीम

0

आयस्क्रीम हा जलळ जवळ सगळ्यांचाच वीक पाॅईंट असतो. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच आयस्क्रीम आवडते. बाजारात वेगवेगळ्या फ्लेवरचे आयस्क्रीम मिळत असून चॉकलेट आयसक्रीम अनेकांना आवडते. आयस्क्रीम क्रिमी असेल तर अतिशय छान लागते. बच्चे कंपनी सातत्याने आयस्क्रीमचा हट्ट धरते तर आज आपण घरातच केवळ दोन वस्तू आणि साखर यापासून बाजारासारखी क्रिमी आयस्क्रीम बनवायला शिकणार आहोत. ही रेसिपी १०० टक्के तुम्हाला आवडणार आहे.

आयस्क्रीम बनवण्यासाठीच साहित्य :
१) बिस्कीट ( खारी बिस्कीट सोडून तुम्हाला आवडतील त्या कोणत्याही फ्लेवरची बिस्कीट घ्या.) – ८ ते ९
२) दूध – अर्धा लिटर
३) साखर – अर्धी वाटी
४) वेलची – ७ ते ८
५) साय – अर्धी वाटी
कृती :
दूध मंद आचेवर गॅसवर उकळायला ठेवा. बिस्कीट मोडून मिक्सरच्या भांड्यात घाला आणि बारीक पावडर करून घ्या. बिस्कीटाची पावडर वाटीत काढा आणि त्यात पाऊण कप दूध घाला व फेटून मिक्स करा. आता दुधाला उकळी ये असेल, दुध दोन ते तीन मिनिट उकळा यात बिस्कीटाची पावडर हळूहळू मिक्स करा. आता साखर घाला, पिठीसाखर करून घातली तरी चालेल. दूध सतत हलवत राहा साधारण ५ मिनिटांनी दूध मिश्रण गॅस बंद करून काढा आता यात वेलची पूड करून मिक्स करा. आवडत असेल तर व्हेनिला इसेंस, किंवा चॉकलेट फ्लेवरसाठी कोको पावडर दोन चमचे घाला. .मिश्रण रुम टेंपरेचरला येऊ द्या आता ते प्लास्टीक कंटेनरमध्ये घाल. आणि वरून झाकण लावून फ्रिजरला ५ तास लावा. आता तयार आयस्क्रीम काढा व ते मिक्सरला ५ मिनिटे फिरवून घ्या.आता यात साय घाला व दोनच मिनिटे परत फिरवा. असल्यास वरून ड्राय फ्रुट घाला. मिश्रण परत कंटेनरमध्ये घाला आणि झाकण लावून फ्रिजमध्ये ५ तास ठेवा. तयार क्रिमी आयस्क्रीम एंजॉय करा.

आयस्क्रीमचा जो फ्लेवर तुम्हाला आवडतो त्याचा रस तुम्ही यात मिसळू शकता.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.