महाविकास आघाडी सरकारकडून ‘युवा शेतकरी’ व ‘कृषी संशोधक’ पुरस्काराची घोषणा!

0

राज्यात दरवर्षी शेती व पूरक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी व संस्थेस राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. नुकतीच कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सन २०१८ व २०१९ या दोन वर्षांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. शेती क्षेत्रातील सर्वोच्च अशा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील संजीव गणपतराव माने (सन २०१८ करिता), तर सन २०१९ करिता बारामती तालुक्यातील पिंपळी येथील राजेंद्र दिनकरराव पवार व नागपूर जिल्ह्यातील सोनेगाव येथील श्रीमती सुनंदा संतोषरावजी सालोटकर (जाधव) यांना जाहीर झाल्याची घोषणा कृषीमंत्र्यांनी केली आहे.

याबरोबरच पुढील वर्षापासून ‘युवा शेतकरी’, कृषि शास्त्रज्ञांसाठी ‘कृषि संशोधक’ पुरस्कार नव्याने सुरु करण्यात आल्याचे सांगून आता पुरस्कारांची संख्या ६३ ऐवजी ९९ इतकी केली असल्याचे व पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल केले असल्याचे कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

आर्थिक व कृषि हवामान परिस्थिती अडचणीची असूनदेखील काही शेतकरी आपल्या परीने नवीन प्रयोग व नविन तंत्रज्ञानाचा अवलंब करून परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक होईल असे काम करीत आहेत. अशा शेतकऱ्यांच्या बाबत कृषि विभागाने स्वत: पुढाकार घेऊन संबंधित शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी पुरस्काराचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावेत. याकामी तालुका कृषि अधिकारी यांच्यावर तालुक्यातील प्रस्ताव तयार करण्याची विशेष जबाबदारी देणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.