महाराष्ट्राची देशात विक्रमी कामगिरी!

0

देशातील कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सगळेच राज्य धावपळ करताना दिसून येत आहेत. जे ते आपल्या आपल्या पद्धतीने या परिस्थिती मधून कसा मार्ग काढता येईल या दृष्टीने काम करत आहेत. महाराष्ट्र सरकार ने पण लसीकरणाच्या बाबतीत सकारात्मक पाऊल टाकत लसीकरणाचा वेग वाढवला होता.

याच बाबतीत विक्रमी रित्या लसीकरण हे महाराष्ट्रात झाले आहे. सोमवारी एका दिवसात तब्बल पाच लाख पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्या अनुषंगाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे कौतुक करण्यात आले. महाराष्ट्रात आत्ता पर्यंत १ कोटी ४८ लाख लोकांनी आजतागायत लस घेतली आहे.

महाराष्ट्रात आत्ता पर्यंत सर्वाधिक म्हणजे ६१५५ लसीकरण केंद्रे होती. शासकीय ५३४७ केंद्रे तर खाजगी केंद्रे ही ८०८ होती. राज्य सरकार सध्याच्या पेक्षा दुप्पट वेगाने लसीकरण देण्याच्या विचाराधीन आहे. एक दिवसाला ८ लाख लसीकरणाचे उददिष्ट ठेवण्यात आले आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.