महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वेक्षणात प्रथम; रोहित पवारांनी केली भाजप वर टीका!

0

महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या काळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याच कामगिरी मुळे ‘प्रश्नम’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये 13 राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे दिसून आले आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षावरती बोचरी टीका केली आहे.

 

आमदार रोहित पवार म्हणाले की “‘प्रश्नम’ या संस्थेने देशातील १३ राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन! मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे हे #मविआ सरकारचं यश आहे.

 

उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या भाजपला या बातमीने आनंद होणार नाही, पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये. विशेषत: ज्या उत्तर प्रदेश सरकारचं भाजपकडून नेहमी गुणगान केलं जातं तेथील मुख्यमंत्र्यांचा या सर्वेक्षणात तब्बल पाचवा क्रमांक आहे, हे त्यांनी विसरु नये!”

 

असे म्हणत रोहित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्या सर्वेक्षणा मधील कामाची आठवण करून देत टीका केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.