शेतकरी बचाव कृती समितीतर्फे २७ सप्टेंबरला देशासह महाराष्ट्र बंदची हाक

0

केंद्र सरकारने आणलेल्या शेती कायद्यांविरोधात देशातील शेतकरी गेल्या ९ महिन्यांपासून हे कायदे रद्द करावे या मागणीसाठी जीवाची पर्वा न करता लढत आहे. या आंदोलनात ५०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झालेले आहे. तरी केंद्र सरकार त्याची दखल घेण्यास तयार नाही. केंद्राच्या कारभारामुळे पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत , महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. केंद्राच्या धोरणांमुळे बेरोजगारीही प्रचंड वाढलेली आहे, उत्पन्नाची साधने आटली आहेत. केंद्र सरकारच्या विरोधातील जनतेचा हा संताप २७ सप्टेंबर ला पुकारलेल्या भारत बंद च्या पार्श्वभूमीवर “असंतोष दिवस” पाळून व्यक्त केला जाईल. यामध्ये पुण्यातील विविध कामगार संघटना, व्यापारी संघटना सामील होतील, असे कृती समितीने म्हटले आहे.

बैठकीत केंद्र सरकारच्या शेती कायद्यांना उत्तर म्हणून महाराष्ट्र सरकारने आणलेल्या नवीन शेती कायद्यांवर चर्चा करण्यात आली आणि यामध्ये राज्य सरकारला कलमवार सुचना हरकती सुचविल्या जातील, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. बंद विषयी पुढील नियोजनाची बैठक गणपती विसर्जनानंतर म्हणजे २० सप्टेंबरला घेण्याचा निर्णयही यावेळी जाहीर करण्यात आला.

या बाबतच्या बैठकीला कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, राष्ट्रवादी काँग्रेस राज्य प्रतिनिधी नितीन जाधव, शिवसेनेचे पदाधिकारी राजेंद्र शिंदे, जनता दल (से) चे शहराध्यक्ष विठ्ठल सातव आणि लोकायतचे निरज जैन, स्वप्नील सामिल होते. बैठकीचे आयोजन समितीचे निमंत्रक नितीन पवार यांनी केले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.