बघा ह्या कंपन्यांचा विराट कोहली आहे मालक आणि ब्रँड व्ह्यॅल्यू आहे २१०० करोड रुपये

0

भारतीय क्रिकेट टिमचा स्टार खेळाडू आणि भारताचा कॅप्टन विराट कोहली याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.विराट कोहली फक्त स्टार क्रिकेटरच नाही तर तो एक स्टार बिझनेसमनही आहे.विराटच्या यशस्वी क्रिकेट प्रवासाबरोबरच आज त्याची बिझनेस जर्नीही जाणून घेऊया.विराट कोहलीचे कोणते बिझनेस आहेत तसेच कोणते ब्रॅण्डस आहेत याची माहिती घेण्यापूर्वी विराटबद्दल काही रोचक तथ्य समजून घेऊया.

इंडियन क्रिकेट टिममधील विराट हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याचे इन्स्टाग्रामवर ५५ मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.आणि इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकण्याचे विराट कोहली १करोड ३५लाख रुपये चार्ज करतो.बसला ना शॉक ! पण हे खर आहे.अशाच काही बाबींमुळे विराट हायेस्ट पेड सेलिब्रेटींच्या यादीत समाविष्ट होतो.विराट निरनिराळ्या ब्रँडच्या जाहिराती करत असतो जस की आॅडी कार,टिसॉट वॉचेस बुस्ट, मान्यवर व इतर.या जाहिरातीच्या एका दिवसाच्या शूटसाठी विराट ५ते ६ करोड चार्ज करतो.विराटच्या तडाखेबाज बॅटींगचे चाहते करोडोंच्या घरात आहेत.तर विराट त्याच्या या बॅटवरच एम आर एफचे स्टिकर लावण्यासाठी या कंपनीकडून वर्षाला १२ करोड रुपये वसुलतो.या सगळ्या जर्नीवरून तुमची रंजकता नक्कीच वाढली असेल आता त्याच्या बिझनेस डिल पाहुयात.

विराटने प्युमा ब्रँडसोबत ११०करोडची डील साईन केली आहे.जी आजपर्यंतची रेकॉर्ड डील आहे.आतापर्यंत आपण असे ब्रँड बघितले ज्यांना विराट फक्त प्रमोट करतो पण काही ब्रँड असेही आहेत जे विराटचे स्वताचे आहेत.त्यात पहिला ब्रँड येतो ‘रॉन’.२०१४मध्ये विराटने रॉनचे मेजॉरिटी स्टेक्स खरेदी केले.सचिन तेंडूलकरसोबत विराट रॉन ब्रँडला कोव्हन करतो.रॉन अॅक्वायर केल्यानंतर विराटने लंडनबेस स्टार्ट अपबरोबर मिळून स्पोर्ट कॅनव्हो नावाचे अॅप आणि वेबसाईट लाँच केली.ज्याला विराट कोहली आणि प्रसिध्द फुटबॉल खेळाडू गॅरथ बेलने प्रमोट केले आहे.या अॅपचा मुख्य हेतू होता स्पोर्टस लव्हरना एकाच ठिकाणी कनेक्ट होण्याची संधी देणे.मित्रांनो तुम्ही विराटच्या फिटनेसबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या असतील ज्यात विराट नाॅनव्हेज खात नाही,गोड खात नाही तर हे सगळ खर आहे.इंडियन क्रिकेट टीममध्ये विराट इतका फिटनेस कोणत्याच खेळाडूत नाही.विराटने त्याच्या या फिटनेस प्रेमापायी ‘चिजल’ जीम आणि फिटनेस सेंटरला’ एक्सपाण्ड करण्यासाठी ९०करोडची इन्व्हेस्टमेंट केली आहे.

विराटला लहानपणापासूनच क्रिकेटबरोबरच फुटबॉलचीही आवड आहे.त्याने एका मुलाखतीदरम्यान हे सांगितल होत जर तो क्रिकेटर नसता तर फुटबॉलर किंवा बिझनेसमन असता.विराटने या फुटबॉल लव्हसाठी इंडियन सुपरलिग फुटबॉल टीम ‘एफ सी गोवाचे’ स्टेक्स खरेदी केलेत.याबरोबरच विराटने २०१५मध्ये दुबईबेस टेनिस टीम ‘युएई रॉयल्सचे’ स्टेक्स खरेदी केलेत.या टीममध्ये रॉजर फेडरर सारखे टेनिस लेजंड होते.याबरोबरच विराट रेसलर टीम ‘बेंगलेरू योध्दाचाही’ मालक आहे.विराटच्या यशाची यादी इथेच संपत नाही तर त्याने २०१७ साली ‘जीव्हा’ इलेक्ट्रॉनीक्ससोबत मिळून मुव्ह अॅकोस्टीक नावाचा वायरलेस हेडफोन लाँच केला आहे.ज्यात विराट मेजर स्टेक्स होल्डर आहे.विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू २३७.५ मिलियन$ आहे.भारतीय रुपयात ही व्हॅल्यू २१००करोड रुपये आहे.या सर्व ब्रँडस व कंपनीसोबत विराट आणखी एका कंपनीला कोव्हन करतो,जिच नाव आहे ‘वन एट’.२०२१पर्यंत वन एट मोबाईल लाँच करेल.वन एट भारताचा वेलनोन ब्रँड आहे.ज्याचे खुपसे प्रोडक्ट मार्केटमध्ये आहेत.जसे परफ्युम,कपडे,शूज इत्यादी.१वर्षांत या ब्रँडने १००करोडचा आकडा पार केला आहे.वन एटच्या अॅपरल्ससाठी विराटने प्युमासारख्या ब्रँडसोबत कोलॅब्रेट केले आहे.

या सर्व यशामागे अनेक कॉम्प्रोमाईज समाविष्ट असतात.जे लोकांना दिसत नाहीत.सर्वांना फक्त नेम,फेम आणि पैसा दिसतो.टॉपवर पोहोचण जितक कठीण आहे,तितकच तिथ टिकण कठीण आहे.या सर्व यशावरून एकच कनक्लूजन निघत,ज्यात तुम्हाला पॅशन आहे तेच काम करा.आणि स्वताचे स्किल इतके इम्प्रुव्ह करा की, तुम्ही स्वता एक ब्रँड व्हाल १० गोष्टी एकाचवेळी करण्यापेक्षा एकाच गोष्टीवर फोकस करा.तुम्ही त्यात यशस्वी झालात की मल्टीपल गोष्टी करू शकता.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.