यांचे मेंदू तपासण्याची गरज पहा कोणाला म्हणाले अजित पवार!

0

वेळेच्या बाबतीत उपमुख्यमंत्री अजित पवार किती जागरूक असतात हे महाराष्ट्रातील जनतेला चांगल्या प्रकारे माहित आहे. सकाळी ६ वाजता कित्येक कामाची उद्घाटन त्यांनी केलेली आहेत. लोक, अधिकारी झोपेत असताना कामाची पाहणी करण्याचे किस्से हे लोकांच्यामध्ये प्रसिद्ध आहेत. जितका हजरजबाबी व्यक्तीमत्व म्हणून त्यांना प्रसिध्दी आहे त्या पेक्षा कैक पटीने जास्त “कामाचा माणूस म्हणून” प्रसिध्दी आहे. हे विरोधक सुद्धा खुल्या दिलाने खाजगीत मान्य करत असतात.

सकाळी सात वाजल्या पासून मी लोकांच्या भेटी साठी उपलब्ध असतो. दिवसभर अधिकारी, आयुक्त, मंत्री यांच्याशी मी सतत संपर्कात असतो. इतकेच नव्हे तर भाजप चे आमदार सुद्धा मला कामाच्या निमित्ताने भेटायला येतात. पुण्यात शुक्रवार शनिवार तर रविवारी बारामती मध्ये मी उपलब्ध असतो. गेल्या दीड वर्षापासून माझा हा दिनक्रम आहे असे त्यांनी सांगितले. ज्यांना असे वाटतं की अजित पवार नेटवर्क बाहेर आहेत त्यांचे मेंदू तपासण्याची गरज असल्याचे त्यांनी आक्रमक होत सांगितले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.