आगे आगे देखो होता है क्या .. कंगनाने दिली महाराष्ट्र सरकारला धमकी…

0

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर कंगना रानौत खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली. कंगनाने दिलेली धमकी आणि त्यावर महाराष्ट्र सरकारने सूड म्हणून कंगनाच्या पाली येथील कार्यालयावर चढवलेला बुलडोझर या घटनेने ठाकरे सरकार विरोधी कंगना हा वाद विकोपास गेला होता. सध्या कंगनाच्या चर्चेचा विषय म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर कंगनाने केलेले व्टिट आणि ठाकरे सरकारला दिलेली धमकी हे आहे.

कंगना कोणाचा अपमान करायला मागे पुढे पाहत नाही आणि आणि ती कोणाचा मुलाहिजा ठेवत देखील नाही, त्यामुळे कंगनाच्या नादाला कोणी लागत नाही. याचा प्रत्यय प्रत्येकाला आला आहे. कंगना जे बोलती त्या गोष्टीवर ती ठाम असते , त्यामुळे कंगनाशी पंगा घेणाऱ्यांना देखील कंगना पुरून उरते. नुकतेच कंगनाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टीका केली आहे. अनिल देशमुखांनी दिलेल्या राजीनाम्यावर ती बोलली आहे. एवढ्यावरच न थांबता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील तोफ डागली आहे.

गेल्या वर्षी पाली येथे कंगणाच्या ऑफिसवर ठाकरे सरकारनं बुलडोझर फिरवला होता. त्यामुळे कंगणा भयंकर संतापली होती. तिनं त्यावेळीही सरकारवर टीका केली होती. आपल्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात कंगणा उच्च न्यायालयात गेली होती. न्यायालयानंही तिच्या बाजूनं निकाल दिला होता. तिच्या बंगल्याची केलेली तो़डफोड ही सुडाची कारवाई असल्याचं न्यायालयानं म्हटलं होतं. गेल्या काही दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. एकीकडे करोनाच्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या तर दुसरीकडे ठाकरे सरकारमधल्या मंत्र्यांचा राजीनामा, अशावेळी लोकांना नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न पडला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या धक्कादायक खुलाशानंतर राज्याच्या राजकारणाविषयी लोकं प्रश्न विचारु लागले होते. सोमवारी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याची बातमी कंगणाला समजताच तिनं त्यांच्यावर टीकास्र सोडण्यास सुरु केले. तिनं व्टिट करताना लिहिलं आहे की, ही तर केवळ सुरुवात आहे पुढे पाहा आणखी काय होते ते.कंगणाच्या या व्टिटला नेटक-यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी तिला ट्रोलही केले आहे. मात्र ट्रोलचा कंगणावर काही एक परिणाम झालेला नाही.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.