
ऐका शरद पवारांची जीवन कथा. आनंद शिंदे यांच्या खर्ड्या आवाजात पवारांचे म्युझिकल चरित्र!
‘थोर ज्यांची विद्वत्ता, राबले जे जनहिता, ऐका शरद पवारांची जीवनकथा’ अशा आशयाचे जबरदस्त सुरुवात होणारे शरद पवारांचे हे संगीतमय चरित्र आनंद शिंदे यांच्या आवाजात प्रसारित झाले आहे. आपल्या खर्डया आवाजात महाराष्ट्रातील जनतेला भुरळ घालणारे व्यक्तिमत्व म्हणून आनंद शिंदे यांना ओळखले जाते. त्यांच्या आवाजात हे दमदार चरित्र सर्वांच्या समोर आहे आहे.
कवी एकनाथ माळी यांनी गीते लिहिले आहेत तर आनंद शिंदे यांनी गायली आहेत. शरद पवारांच्या जीवनपट हा समजून घेण्यासाठी “लोक माझे सांगाती” हे त्यांचे आत्मचरित्र वाचले जाते. आता या संगीतमय गीतातून लोकांना शरद पवार यांचे कार्य समजून घेता येणार आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे समर्थक फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभर पसरले आहेत. शरद पवारांच्या जीवनगाथेबद्दल सर्वांना माहिती व्हावी, यासाठी ती संगीत स्वरुपात सादर करण्यात आली आहे. लोकांनी सोशल मीडियावर फारच व्हिडिओ शेअर केले आहेत.