सांगली, जळगावप्रमाणे भाजपला अजून एक धक्का, अहमदनगर महापालिकेवर शिवसेनेचा महापौर बसणार?

0

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या नंतर भाजपला ज्याप्रकारे धोबी पछाड करत तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. हाच पॅटर्न स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये सक्षमपणे राबविण्यात येतो की काय या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सांगली आणि जळगाव महापालिकेमध्ये भाजपचा टप्प्यात कार्यक्रम करण्यात आला. आता अहमदनगर मध्ये नेमके काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर महापालिका महापौर पदासाठी लवकरच निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याची माहिती मिळत आहे. अहमदनगर महापालिकेवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं भाजपचा महापौर आहे. मात्र, आता शिवसेनेचा उमेदवार देण्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याची माहिती मिळत आहे.

काल शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप उपस्थित होते या बैठकीमध्ये शिवसेनेचा उमेदवार महापौर पदासाठी देण्याबद्दल एकमत झाल्याचे माहिती मिळत आहे.

अहमदनगर महापालिका मधील पक्षीय बल सध्या खालील प्रमाणे आहे.
शिवसेना- 23
राष्ट्रवादी-18
भाजप-15
काँग्रेस-5
बसपा-4
सपा-1
अपक्ष-2

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.