सक्षणा सलगर यांना धमकी देणार्याला घरातून ओढून मारू, सातारा राष्ट्रवादी महिला आक्रमक !

0

महिलांशी बोलत असताना सभ्य पणाने बोलण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे सक्षणा सलगर यांनी गोपीचंद पडळकर यांच्या सातत्याने राष्ट्रवादी वरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यावर आक्रमक होत सवाल उपस्थित केला होता. यावरून चांगलीच राजकारण पेटला असे दिसून आले. गोपीचंद पडळकर यांच्या वरती टीका करणे सोडून दे अशा आशयाची धमकी संबंधित फोनवरून देण्यात आले सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना घरात घुसून अत्याचार करण्याची धमकी सुद्धा त्या फोन वरून देण्यात आली.

या प्रकारानंतर सातारा राष्ट्रवादी महिला चांगल्याच संतप्त झाल्या आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोबतच बोलत असताना त्यांनी माहिती दिली की गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी ही धमकी दिली आहे असा आरोप युवती प्रदेश सचिव स्मिता देशमुख यांनी केला असून धमकी देणाऱ्या घरात घुसून मारणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.