चला हवा येऊ द्या फेम निलेश साबळेची लव्हस्टोरी आहे फुल फिल्मी;पत्नी आहे बॉलिवूड अभिनेत्री पेक्षा सुंदर..!

0

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लोकांना वेड लावणारा शो म्हणजे चला हवा येऊ द्या.खरंतर कॉमेडी चा किंग म्हणून जरी त्याला नाव दिलं तरी वावगं ठरणार नाही,कारण कित्येक कलाकारांची स्क्रिप्ट च लेखन सुद्धा निलेश साबळे करतात.

‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ असे म्हणत डॉ. निलेश साबळेने शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर केले. जबरदस्त कॉमेडी टायमिंगने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. निलेश साबळेचे खूप मोठे फॅन फॉलोव्हिंग आहे. त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.

खरंतर निलेश साबळे ने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र त्याला खरी ओळख ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून मिळाली. पण डॉक्टरची पदवी घेऊनही निलेशने अभिनयाच्या आवडीसाठी या क्षेत्रात कष्ट घेतले.

यामध्ये त्याला तिच्या कुटुंबियांची आणि पत्नी गौरीची मोठी साथ मिळाली होती.खरंतर निलेश साबळेची पत्नी लाइमलाईटपासून दूर राहते. ती आणि निलेशदेखील सोशल मीडियावर तितके सक्रिय दिसत नाही. त्यामुळे त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे फोटोसुद्धा तितकेसे पाहायला मिळत नाहीत.

निलेश आणि गौरीची लव्हस्टोरी खूप फिल्मी आहे. निलेश आणि गौरीचा लव्ह मॅरिज झाले आहे. या दोघांची ओळख कॉलेजमध्येच झाली होती. खरे सांगायचे तर हे दोघे एकाच कॉलेजमध्ये नव्हते. मात्र एका कार्यक्रमानिमित्त निलेश गौरीच्या कॉलेजमध्ये गेला होता.

यावेळी दोघांची पहिली भेट झाली होती. या भेटीनंतर निलेश आणि गौरीमध्ये मैत्री झाली होती. हे दोघे एकेमकांचे खास मित्र बनले होते. काही कालावधीनंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. यानंतर या दोघांनी लग्नसुद्धा केले.

आता या दोघांच्या संसाराला जवळजवळ १०-११ वर्षे झाली आहेत.नात्याच्या सुरुवातीलाच निलेशने गौरीला सांगितले होते की आपल्याला या वैद्यकीय क्षेत्रात अजिबात रस नाही. मला अभिनयाचे वेड आहे. त्यानंतर गौरीने त्याला प्रत्येक निर्णयात साथ देण्याची कबूली दिली होती आणि गौरी  त्याच्या पाठीशी उभी राहिली.

खरंतर अभिनय क्षेत्रात आवड होती त्यामुळे ह्या माणसाने स्वतःचा एक वेगळाच साम्राज्य स्थापन केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून निलेश साबळे अख्ख्या महाराष्ट्राला हसवतोय. जणू आता तर महाराष्ट्राला त्याची सवयच लागली.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.