
“माझं काय व्हायचं ते होऊ द्या, मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं”
आ. निलेश लंके हे सध्या जोरदार कामाच्या जोरावर लोकांच्या हृदयाला हात घालताना दिसत आहेत. स्वतः च्या जीवाची पर्वा न करता ते अहोरात्र काम करताना दिसत आहेत. त्यांनी लोकांच्या मनातील भीती दूर व्हावी म्हणून त्यांनी कोविड सेंटर येथे जेवण करून नागरिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आपल्या कृती मधून प्रयत्न केला होता.
त्यांना अशा काळात तुम्हाला काळजी वाटत नाही का ? किंवा कसली भीती वाटत नाही का? असे विचारले असता त्यांनी सांगितले की”माझं काय व्हायचं ते होऊ द्या, मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं” त्यामुळे मी असुरक्षित असलो तरी चालेल पण माझी लोक सुरक्षित असली पाहिजेत, हे शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांचे आहेत.
नियमितपणे ते रुग्णांची माहिती घेत असतात. तसेच वेळोवेळी जाऊन ते स्वतः रुग्णांची देखभाल करत असतात. त्यामुळे निलेश लंके यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या या कामाची दखल परदेशातून घेतली गेली आहे. मोठ्या प्रमाणात परदेशातून सुद्धा त्यांना निधी मिळाला आहे.