सर्वपक्षीय नेत्यांनी केली केंद्र सरकारला मोफत लसीकरणाची मागणी!

0

देशात कोरोनाच्या मुळे हाहाकार उडाला आहे. रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची गोष्ट आहे. दिवसागणिक संख्या वाढत चालली आहे. रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही की इंजेक्शन मिळत नाही. रुग्णांच्या वाढत्या संख्येवर जास्तीत जास्त लसीकरण हाच मार्ग असल्याचे दिसून येत आहे. भारतातील बहुतांश जनता ही गरीब असल्याने सरकार ने लसीकरण हे मोफत करावं ही मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.

निर्माण झालेल्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मोफत लसीकरणाची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी. देवेगौडा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह देशातील १३ नेत्यांनी केंद्र सरकारकडे तत्काळ मोफत लसीकरण सुरू करण्याची मागणी केली आहे.

या मागणीचे निवेदन राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. या मध्ये देशातील परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली आहे. ऑक्सिजन पुरवठा अशा आरोग्याच्या संदर्भातील मागण्या करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण अर्थसंकल्पात ३५,००० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. हा निधी करोना लसीकरणासाठी वापरण्यात यावा, असंही या ठिकाणी म्हटलं आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी प्रसिद्ध केलेल्या या निवेदनावर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, द्रमुकचे नेते एमके स्टॅलिन, बसपा अध्यक्षा मायावती, फारूक अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राजदचे नेते तेजस्वी यादव, डी. राजा, सीपीआय(एम)चे नेते सीताराम येचुरी यांची नावे आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.