महाराष्ट्राची ही प्रसिद्ध लावणी साम्रज्ञी करणार अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश !

0

लावणी साम्रज्ञी सुरेखा पुणेकर करणार ‘अजित दादा पवारांच्या ‘ उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार्यांची संख्या वाढती असून नवीन कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासोबतच पक्ष सोडून गेलेल्या अनेकजणांनी घरवापसी केलेली आहे. नुकतीच राष्ट्रवादीची जंबो कार्यकारणी जाहीर झाली असून राष्ट्रवादीने ओबीसी सेलची निवडही पार पाडली आहे. राष्ट्रवादीने कार्यकर्ते मेळावे, संघटना मजबुतीकरणासाठी प्रयत्न सुरू झाले असून सर्वच कार्यकर्ते कष्ट घेताना दिसून येत आहे.

राष्ट्रवादीने कला आणि संस्कृती यांच वेगळ संघटन ठेवल असून काही दिवसांपूर्वी त्यात वैशाली माडे हिने प्रवेश केला होता. सध्या लावणी साम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. सुरेखा पुणेकर यांनी वयाच्या आठव्या वर्षी लावणी नृत्य करायला सुरुवात केली. परदेशातही सुरेखाताईंचे लावणी कार्यक्रम झाले असून घरंदाज लावणी अशी त्यांच्या लावणीला ओळख आहे. महिलाही त्यांचे लावणी कार्यक्रम बघत असतात.

सुरेखा पुणेकर १६ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या इतकी वर्ष मी कलेची सेवा केली आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री अजित दादापवार यांच्या मार्गदर्शनाखाली मला जनतेची सेवा करायची असून त्यादृष्टीने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरेखा ताईंचा हा पक्ष प्रवेश राष्ट्रवादीला बळ देणारा ठरेल अशी चर्चा व्यक्त होत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.